शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 19:03 IST

कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या असं फडणवीस म्हणाले.

मुंबई - ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली. ईडीच्या छापेमारीनंतर राज्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. कोविड काळातील घोटाळ्याच्या आरोपावरून ईडीने ही छापेमारी केली, नेमका कोविड जम्बो सेंटर घोटाळा आहे काय याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या. लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले. पुण्यात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. कोविड काळात अनेक खोट्या कंपन्या उभारण्यात आल्या. त्यात अनुभव नसलेल्यांना कंत्राट देण्यात आली. त्याबाबत चौकशी सुरू होती. आता ही चौकशी कुठपर्यंत पोहचली, छाप्यात काय सापडले हे ईडीच सांगू शकते मला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं. 

काय आहे घोटाळा?कोरोनाकाळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी कंत्राटे काढण्यात आली. राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि भागीदारांची एक कंपनी होती. डॉ. हेमंत गुप्ता, संजय शाह, राजू साळुंखेही भागीदार आहेत. लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसला कुठलाही अनुभव नसताना कंत्राटे देण्यात आली. हे कंत्राट वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे होते. यात कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. बीएमसीला सादर केलेले पार्टनरशिप डिडही खोटे असल्याचे बोलले जात आहे. पुरेसा स्टाफ नसल्याने इंटर्न डॉक्टरांनाही नेमल्याचे उघड झाले आहे. एकूण १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. भविष्यात फासे उलटे पडतील - राऊतईडीच्या या कारवाईवरून संजय राऊतांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर निशाणा साधला. ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्यात, त्यात ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या घरी धाड टाकलीय, कोविड घोटाळ्याच्या नावाखाली टार्गेट केले जातेय. जे शिंदे गटात गेलेत ते मुख्य लाभार्थी आहेत त्यांना का वगळले? खरोखरच चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा, दुसऱ्या गटात जाऊन कातडी वाचवतायेत त्या सगळ्यांची चौकशी करा. शिवसेनेच्या प्रमुख लोकांवर कारवाई करायची. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही या कारवाईला हिंमतीने सामोरे जायला तयार आहोत. अनिल परब, रवींद्र वायकर, मी स्वत: आम्ही सामोरे गेलोत, भविष्यात सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSanjay Rautसंजय राऊत