शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 06:01 IST

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला.

मुंबई :

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली. पण, परत परत ती दाखविता येणार नाही, असे सूचक उद्गार शिंदे यांनी मुंडेंबाबत काढले.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे विधान भवनाच्या पायऱ्या चढत असताना जोरदार घोषणाबाजी गेल्या आठवड्यात केली होती. ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘ताट, वाटी चलो गुवाहाटी’ अशा घोषणा देण्यात मुंडे पुढे होते. आज थेट नगराध्यक्ष निवडीसंबंधीच्या विधेयकावर बोलताना शिंदे यांनी मुंडे यांना लक्ष्य केले. धनंजय मुंडे परवा मोठमोठ्याने ओरडत होते, ‘चलो गुवाहाटी... चलो गुवाहाटी...’ अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत होते. जणू काय ते खूप वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. आता, यांच्याबद्दल काय बोलावे, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावरील चर्चेवेळी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. विधानभवनात येतानाच जणू काही बाह्या सरसावत अचूक टायमिंग साधायचा मनसुबा त्यांनी रचला असावा. 

एकनाथच राहा, ‘ऐकनाथ’ होऊ नका : मुंडेनगराध्यक्ष पदाबाबत नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला निर्णय भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बदलावा लागला हे दुर्दैवी आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. सत्ता बदलताच मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा निर्णय स्वत:च बदलला, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्कील टिप्पणी मुंडेंनी केली.विरोधकांची पुन्हा नारेबाजी‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके, माजलेत बोके’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘गद्दारांचं सरकार हाय हाय’, ‘आले रे आले.. गद्दार आले’  अशा घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी सोमवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. ‘ईडी ज्याच्या घरी, तो भाजपच्या दारी’ अशी घोषणाही देण्यात आली.

मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा; अजित पवारमुंबई : नगराध्यक्षच कशाला, मग मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा ना. अहो! आमदार तुमच्या पाठीशी होते म्हणून त्यांच्यातून तुम्ही मुख्यमंत्री झाला. नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची आधीची पद्धत कायम ठेवली तर एखाद्या नगरसेवकाला एकनाथ शिंदे बनून नगरसेवकांमधून नगराध्यक्ष बनता येईल ना...! असे चिमटे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत काढले. थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या विधेयकावरील चर्चेत अजित पवार म्हणाले की, थेट नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत आणली तर धनदांडगे, ‘मनी-मसल पॉवर’ असलेले लोकच नगराध्यक्ष होतील. सामान्य आर्थिक परिस्थितीचे नगरसेवक नगराध्यक्ष  होणार नाहीत.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDhananjay Mundeधनंजय मुंडे