शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 11:45 IST

Ajit pawar Nawab Malik News Update: देवगिरी बंगल्यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाच्या आमदारांनाही बोलविण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाला कारणीभूत ठरल्याची टीका झेलणारे अजित पवार महायुतीपासून फारकत घेणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाने मविआ सरकार असताना दाऊदशी संबंध असल्यावरून प्रचंड विरोध केलेला त्या नवाब मलिकांनी देखील हजेरी लावली. यावरून आता महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून विरोधकांनीही यावरून शरसंधान साधण्यास सुरुवात केली आहे. 

देवगिरी बंगल्यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाच्या आमदारांनाही बोलविण्यात आले होते. गेल्या विधानसभा अधिवेशनावेळी मलिक यांना आजारपणामुळे उपचारासाठी जामिन मिळाला होता. तेव्हा मलिक अधिवेशनात आले होते, परंतू त्यांना महायुतीपासून वेगळे बसविण्यात आले होते. परंतू, आता थेट राष्ट्रवादीच्या बैठकीतच मलिक दिसल्याने अजित पवारांनी भाजपावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. 

भाजपकडून मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाला जाहीरपणे विरोध करण्यात आलेला असताना अजित पवारांनी मलिक यांना बैठकीस बोलावल्याने महायुतीत पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा, अशी मागणी केली आहे. 

महायुतीमध्ये सारे काही अलबेल चालू आहे असे मला दिसत नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या सुरु आहेत. एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः घोषणा करतात. हे कुरघोडीचे राजकारण तिघांमध्ये प्रचंड वाढले आहे. नवाब मालिकांच्या मतांची गरज आहे म्हणून कदाचित त्यांना बोलावले असणार, ते सोबत आहेत की नाहीत याचा खुलासा आता फडवीसांनीच करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी काही त्रास होतोय का, असा सवाल पत्रकारांना केला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस