शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"आरोपी भाजपचा कार्यकर्ता, राजीनामा द्या"; विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "अशा घटनांवेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:15 IST

दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.

Badlapur School Case : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकणातील पीडितांच्या पालकांची तक्रार घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालकांना ११ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. आरोपीला अटक झाली असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाल्याचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवी असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आठवड्याभरानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. यावरुनच विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना विरोधी पक्ष संवेदनाहीन असल्याचे म्हटलं आहे.

मी तर असंही ऐकलं आहे की बदलापूरची ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित आहे. मात्र, मी यात राजकारण आणत नाही. तसा माझा हेतूही नाही. कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर लेकींना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

विरोधकांच्या मनामध्ये निव्वळ राजकारण - देवेंद्र फडणवीस

"विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो याचे दुर्दैव वाटते. संवेदनाहीन अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे. किमान ज्यावेळी अशा घडतात तेव्हा राजकारण करायाचं नसतं. विरोधकांच्या मनामध्ये निव्वळ राजकारणाशिवाय दुसरं काही नाही. तेच राजकारण बाहेर येत आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं शोभत नाही. अशा संवेदनशील घटना घडतात तेव्हा त्यांनी राजकीय न वागता त्याठिकाणी  जनतेला काय देता येईल आणि न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारची वागायचं असतं. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंना राजकारण करायचं आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळे