मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 29, 2021 05:22 PM2021-01-29T17:22:13+5:302021-01-29T18:10:16+5:30

मनसे लवकरच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार असल्याची माहिती

Devendra Fadnavis made a big comment on MNS president Raj Thackeray's visit to Ayodhya | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

Next

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदा पक्षाचा झेंडा बदलत भगव्या रंगाच्या नवीन झेंड्यात शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला. तीच मनसे हिंदुत्वाकडे झुकते आहे याची नांदी होती. आणि आता मनसे लवकरच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान या अयोध्या दौऱ्याची नियोजन व तयारी सुरु असल्याचे समोर येत आहे. या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहे. यात सर्वप्रथम शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आघाडी घेत आपली प्रतिक्रिया दिली. आता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मोठे भाष्य करताना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना एक सल्ला देखील दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  माजी मंत्री गिरीश महाजन, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध भाजप नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे. 

अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी; म्हणाले...

मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये शुक्रवारी( दि. २९) मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला मनसेचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे देखील बैठकीसाठी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या या बैठकीत राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित केला जाणार असल्याचं बोलले जात आहे. तसे झाले तर राज ठाकरे यांचा हा पहिला मोठा दौरा ठरणार आहे. 

"मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही; झेंड्या बदलणाऱ्यांबद्दल काय बोलणार"

राज्यात भाजप- मनसे युती ? 

राज्यात भाजपशी फारकत घेतल्यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीकाही वेळोवेळी होत आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत मनसेने हिंदुत्वाकडे वाटेने मार्गक्रमण सुरु केले आहे. त्याचवेळी भाजप आणि मनसेची एकत्र येण्याच्या चर्चाना देखील मोठे उधाण आहे आहे. 

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले.. 
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू", असं संजय राऊत म्हणाले

Web Title: Devendra Fadnavis made a big comment on MNS president Raj Thackeray's visit to Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.