लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते, पण माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. अजित पवार जर समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असतील, एकत्रीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का? किंबहुना एकत्रीकरणाची चर्चा भाजपसोबत करणार नाहीत का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यादरम्यान विलिनीकरणाबाबत नेमके काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. अशा प्रकारची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती मला नाही. सध्याच्या दुःखद प्रसंगी याबाबतचे राजकारण करणे मला योग्य वाटत नाही, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो; पण ते मी करणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दादा माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे
"दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांचे निर्णय हे सर्वस्वी तेच घेत असतात. त्याच्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो; पण अजितदादांचा पक्ष सरकारमध्ये आहे. असा कोणताही निर्णय ते घेणार असते, तर त्यांनी आमच्याशी चर्चा निश्चित केली असती. ते जर चर्चा करत होते म्हणजे सरकारमधून ते बाहेर पडणार होते का? सरकार तर स्थिर आहे. त्यांचे आणि शरद पवारांचे काय बोलणे झाले मला माहिती नाही; पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहिती नाही. तसेच अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच आम्ही एक तास गप्पा मारल्या होत्या", असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Web Summary : Fadnavis doubts Ajit Pawar kept merger talks secret, given their close relationship. He questions if BJP would be excluded from such discussions. Fadnavis refrains from further comment out of respect for current circumstances, noting Pawar would've discussed leaving the stable government.
Web Summary : फडणवीस को संदेह है कि अजित पवार ने विलय की बात गुप्त रखी, उनके घनिष्ठ संबंध को देखते हुए। उन्होंने सवाल किया कि क्या भाजपा को ऐसी चर्चाओं से बाहर रखा जाएगा। फडणवीस ने वर्तमान परिस्थितियों का सम्मान करते हुए आगे टिप्पणी करने से परहेज किया।