Devendra Fadnavis criticizes Thackeray government over farmers issues | बंगले, दालनं, पालकमंत्रीपदाचे वाद संपल्यावर ठाकरे सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल : देवेंद्र फडणवीस

बंगले, दालनं, पालकमंत्रीपदाचे वाद संपल्यावर ठाकरे सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात नव्याने आलेल्या ठाकरे सरकाराला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये सत्तेसाठी सुरु असेलला वाद संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार असल्याचा खोचक टोला माजी मुख्यंमत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्तधारी पक्षांना लगावला आहे.

राज्यात नवीन सरकार आले आहे. मात्र या सरकाराला शेतकरी,शेती, कारखानदारी,सहकार,फळबाग याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाले नाही. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सुरु असलेले भांडण संपले तर त्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

तर सद्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांमध्ये बंगले,दालने,पालकमंत्रीपदीवरून वाद सुरु असून, हे सर्व वाद पुढील सहा-आठ महिन्यात जर मिटली तर, त्यांनतर सरकारमध्ये असलेले नेते कदाचित शेतकऱ्यांकडे वळून पाहतील. मात्र तोपर्यंत तरी ते शेतकऱ्यांकडे लक्ष देतील असे वाटत नसल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

Web Title: Devendra Fadnavis criticizes Thackeray government over farmers issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.