शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'महा'शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण! शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झाल्यापासून शपथविधी सोहळा संपन्न होईपर्यंत सर्वकाही लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. संध्याकाळी ५.३० वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली असून त्यात राज्यातील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यासह प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित राहतील. या सोहळ्याचं निमंत्रण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे ते सोहळ्याला उपस्थित राहणार का याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनाही सोहळ्याचं निमंत्रण दिले आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री या सोहळ्यात उपस्थित राहतील. राजशिष्टाचार विभागाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. 

शपथविधी सोहळा नेमका कसा असणार?

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा लोकोत्सवाच्या स्वरुपात संपन्न होणार

या शपथविधी सोहळ्याचं पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण केले जाईल

महाराष्ट्रातील बसस्टॉप, थिएटर तसेच सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे सोहळा लाईव्ह दाखवण्यात येईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झाल्यापासून शपथविधी सोहळा संपन्न होईपर्यंत सर्वकाही लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल

या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात उद्योगपती, बॉलिवूड-मराठी कलाकार यांचाही समावेश असेल

या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात ६०-७० हजार लोकांची उपस्थिती असेल

भाजपाकडून प्रत्येक जिल्ह्यातील २९ प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

लोकसभा, राज्यसभा सदस्यमाजी खासदार, आमदारकेंद्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारीविभाग संघटन मंत्री, विशेष निमंत्रित सदस्यलोकसभा, विधानसभा कोअर कमिटी प्रमुखजिल्हाध्यक्ष, महामंत्री, मुंबईतील पदाधिकारीप्रदेश प्रवक्ते, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्षमहापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे