शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

सस्पेंस संपला! अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:23 IST

Eknath Shinde Oath News: आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजी झाले आहेत. अखेर गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेले नाराजीनाट्य संपुष्टात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री नाही तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. त्यास यश आले आहे. 

मुख्यमंत्री पदी २.५ वर्षे घालविल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणे शिंदेंना पटले नसावे, परंतू आता ते उपमुख्यंत्री होण्यास राजी झाले आहेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यावरूनही शिंदे नाराज झाल्याचे वृत्त होते. तसेच शिंदेंनी गृहमंत्री पद व अर्थमंत्री पद मागितल्याचेही सांगितले जात होते. परंतू, याला भाजपाने होकार दिलेला नव्हता. 

आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. तिथे शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सायंकाळी देवेंद्र फडणवीसांबरोबर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री होणार का किंवा दोनच जण शपथ घेणार का शक्यतांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय गायकवाड यांच्यासह काही आमदार आले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाह