शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:51 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालीली ही कार्यकारिणीची बैठक आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी तुफान फटकेबाजी करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.

मी एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करीन, एक हिंमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा, हा बाहेर पडला. ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ठरलं नव्हतं सरकार येईलच, कदाचीत असेही घडले असते, की एवढे लोक नसते आले तर त्यांचे राजकीय सामाजिक जीवन, कमावलेली पुण्याई कदाचित समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. अशा शब्दात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. एवढेच नाही, तर आपण मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा का केली, याचा खुलाही फडणवीस यांनी यावेळी केला. ते पनवेलमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालीली ही कार्यकारिणीची बैठक आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी तुफान फटकेबाजी करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, त्यांनी (एकनाथ शिंदे) ठरवलं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली जात असेल, ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावं लागंत असेल, ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब असं म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन. त्यांच्याच सोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सोबत जावं लागत असेल, एवढेच नाही, तर स्वा. सावरकरांचा रोज अपमान होत असताना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, दाऊदशी संबंधित प्रकरणात मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरोधात अक्षर बोलता येत नाही. त्याला मंत्री पदावरून काढायची हिंमत नेते दाखवू शकत नाही. अशा परिस्थितीत जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता, तो हे सहन करू शकत नव्हता.

हे सत्तेसाठी नाही, विचारासाठी झालेलं परिवर्तन- फडणवीस म्हणाले, हे सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी झालेले परिवर्तन आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हे आवश्यक होतं आणि अनेक कथा-कहाण्या तयार झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा झाली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. हे अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. ते एवढे लोक घेऊन येत असताना, त्यांना नेतृत्व देणं महत्त्वाचं तर होतंच, पण त्याहूनही महत्वाचं होतं, तर भारतीय जनता पार्टी सत्तापिपासू नाही, आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो, अशांपैकी आम्ही नाही. तर आमची विचाराची लढाई आहे. आता जी मायनॉरिटीत आली आहे, त्या शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. आता एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना आहे. 

तेव्हा आमच्यासोबत षड्यंत्र झालं -फडणवीस म्हणाले, 'त्या'  ठिकाणी कुठलाही शब्द दिलेला नव्हता (मुख्यमंत्रीपदासंदर्भात). मी स्वतः त्यांच्या सोबत बसलेलो होतो. आमच्यासोबत षड्यंत्र झालं. आमच्या जागा पाडण्यात आल्या. चंद्रकांतदादा, आपण भोळे लोक आहोत. युतीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून बंडखोर मागे घेतले. त्यांच्यासाठी हवी ती मदत केली. पण, त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. नंबर गेम फसतो की नाही, याची ते वाट बघत होते. निकाल यायच्या आधीच, आमचे सगळे मार्ग खुले आहेत, असे त्यांनी म्हटले होते. मी फोन करत होतो, पण ते फोन घेत नव्हते. कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली, त्याच निर्णयात आजच्या परिस्थितीचं बीजारोपण, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेBJPभाजपा