शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:58 IST

काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला

नागपूर: सत्ता गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करावं असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जायला हवं, असं केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं जोर लावला आहे. सत्ता गेल्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपाला लक्ष्य केलं. फडणवीस यांनी पाच वर्षे सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली, हे आता कळेलच. आपल्याला जनतेनं का पराभूत केलं याचं चिंतन त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जावं, असा टोला केदार यांनी लगावला. यावेळी त्यांना माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळेंना त्यांच्याच पक्षानं चिंतन करण्यास सांगितलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा सवाल करत चिमटा काढला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेना स्वतंत्र लढत आहे. निवडणूक निकालानंतर नागपुरमध्ये महाविकास आघाडी दिसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्याची गरज भासणार नाही, असं उत्तर केदार यांनी दिलं. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे इतर गोष्टींची चर्चा नको, असं केदार म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसBJPभाजपा