शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला बनविणार विकासाचे ‘मॉडेल’

By admin | Updated: January 7, 2015 00:59 IST

प्रत्येक शहराचे काही वैशिष्ट्य असते. त्यातून विकास होत असतो. नागपूरचा सुंदर व स्वच्छ शहर असा लौकिक आहे. विकासाची अधिक उंची गाठून या शहराला विकासाचे ‘मॉडेल’ बनविण्याचा

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा संकल्प : जनसहभागावर भरनागपूर : प्रत्येक शहराचे काही वैशिष्ट्य असते. त्यातून विकास होत असतो. नागपूरचा सुंदर व स्वच्छ शहर असा लौकिक आहे. विकासाची अधिक उंची गाठून या शहराला विकासाचे ‘मॉडेल’ बनविण्याचा संकल्प श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी व्यक्त केला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.शहर मोठे आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे शहर असल्याने येथील आयुक्तपद हे एक आव्हानच आहे. ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहे. शहराच्या सर्वांगीण विकासात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. शहराला मोठे करायचे आहे, अशी अधिकाऱ्यांसोबतच प्रत्येक नागरिकाची भावना असायला हवी. नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याला सर्वप्रथम प्राधान्य राहील. लोकांची कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी प्रशासनात गुड गव्हर्नन्स आणण्याचा प्रयत्न राहील. यासाठी संवेदशीलता, समर्पित वृत्ती या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्था आत्मनिर्भर असायला हव्या, त्यांनी आपल्या उत्पन्नातून प्रशासन व लोकांच्या गरजा भागवाव्या. विकासात्मक नवीन गुंतवणुकीसाठी राज्य व केंद्र सरकारची मदत घ्यावी. शहर विकासात नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका या दोन्ही संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. समन्वयातून, एकत्रित कृ तीतून विकासाला प्राधान्य राहील. शहरातील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊ न यामागील कारणांचा शोध घेऊ न ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू. मनपाचे उत्पन्न वाढावे, यासाठी नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल. कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व लोकांच्या सोयीची होईल, यासाठी प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)वर्धने यांच्याकडून सूत्रे स्वीकारलीमावळते आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडून श्रावण हर्डीकर यांनी सकाळी पदाची सूत्रे स्वीकारली. वर्धने यांच्याक डून त्यांनी विविध विभागासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी मनपातील अधिकारी उपस्थित होते.