प्राचीन चिकित्सा पद्धती विकसित करून जपणार
By Admin | Updated: September 29, 2015 02:01 IST2015-09-29T02:01:44+5:302015-09-29T02:01:44+5:30
रिफ्लेक्सोलॉजी, चुंबक चिकित्सा, अॅक्युप्रेशर, योगा, प्राणायाम यासह भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धती जपणे गरजेचे आहे.

प्राचीन चिकित्सा पद्धती विकसित करून जपणार
औरंगाबाद : रिफ्लेक्सोलॉजी, चुंबक चिकित्सा, अॅक्युप्रेशर, योगा, प्राणायाम यासह भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धती जपणे गरजेचे आहे. त्या विकसित करून नव्या रूपात लोकांसमोर आणायच्या आहेत. अधिकाधिक रुग्णांना त्यांचा फायदा होईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा सूर जागतिक रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त रविवारी आयोजित पहिली राष्ट्रीय परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात तज्ज्ञांनी
व्यक्त केला.
२१ ते २७ सप्टेंबरदरम्यान जागतिक रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अॅक्युप्रेशर ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे रविवारी प्रेसिडेंट लॉन येथे राष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
खा. चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डॉ. पी.बी. लोहिया, डॉ. दिलीप कांबळे, संयोजक डॉ. अनिल जैन यांची उपस्थिती होती. सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशर क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत देशभरातील ४० डॉक्टरांना गोल्ड, सिल्वर
आणि डायमंड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोहळ्यात मार्गदर्शन करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, शहरात डॉ. अनिल जैन यांनी २००३मध्ये अॅक्युप्रेसनर ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च सेंटरची स्थापना केली. या माध्यमातून रिफ्लेक्सोलॉजीला वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे. देशात रिफ्लेक्सोलॉजीद्वारे देशात मोठे कार्य होत असून, त्यास आणखी पुढे नेण्याची आवश्यकता आहे.
हरिभाऊ बागडे म्हणाले, अॅक्युप्रेशर उपचारपद्धतीचा आज देशभरात प्रसार झाला आहे. या तंत्रज्ञानाचा समाजाला उपयोग होत आहे. खा. खैरे म्हणाले, आगामी कालावधीत रिफ्लेक्सोलॉजीचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होईल.
डॉ. अनिल जैन म्हणाले, गेल्या १० वर्षांपासून रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह आयोजित केला जात आहे; परंतु भारतात या प्रकारचा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. देशात प्रथमच या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यात अॅक्युप्रेशरशी संबंधित डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सप्ताहानिमित्त शहरात २१ ठिकाणी नि:शुल्क चिकित्सा व जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर परिषदेत देशभरातून आलेल्या डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. आयोजित कार्यक्रमासाठी नीलेश कांकरिया, संदीप काठेड, शालीन बुनलिया, डॉ. विजय जैन, शैलेश चांदीवाल, विनया चामले, बाळासाहेब जोशी, सय्यद अजमत, शेख खालीद, हर्षाली संचेती, नुपूर बलदवा, मनीष बुनलिया, राजेंद्र पगारिया, झैनाब जमाल,
पुष्पा जाधव, डॉ. एस.बी. गोरवाडकर, डॉ. योगेश जैन आदींनी
परिश्रम घेतले.