सुवर्ण पटकावण्याचा निर्धार

By Admin | Updated: September 22, 2016 03:56 IST2016-09-22T03:56:52+5:302016-09-22T03:56:52+5:30

जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची निवड झाली

The determination to win gold | सुवर्ण पटकावण्याचा निर्धार

सुवर्ण पटकावण्याचा निर्धार

जितेंद्र कालेकर,

ठाणे- दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वास यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
येत्या २३ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी यादव यांच्यासह भारताचा अव्वल खेळाडू पश्चिम बंगालचा सौरभ घोषाल आणि पंजाबच्या कसलेल्या हरविंदरसिंग संधू यांचीही निवड झाली आहे. गेली पाच वर्षे उत्तर प्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या यादव यांची अलीकडेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.
वयाच्या दहाव्या वर्षापासून यादव यांनी स्क्वॉश खेळण्यास सुरुवात केली. मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे त्यांचा दररोज सराव सुरू असतो. तसेच, भारताचे अनुभवी खेळाडू मोहम्मद साकीब यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांचा सराव सुरू आहे.
सात वेळा राष्ट्रीय आणि दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेली असल्याने त्या अनुभवाच्या जोरावर जोहान्सबर्ग येथील स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार असल्याचे यादव म्हणाले.
।पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून छाप...
२०१२ ते २०१६ या पाच वर्षांमध्ये लखनौ आणि कानपूर येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून यादव यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. महाराष्ट्रातही नागपूर, कोल्हापूर येथे त्यांनी अधीक्षक म्हणून कामगिरी केली आहे.
सौरभ घोषाल आणि हरविंदर सिंग संधू या बलाढ्यखेळाडूंच्या उपस्थितीत यशस्वी यादव यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.

Web Title: The determination to win gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.