विनयभंग करणारा आठ दिवसांनंतर अटकेत

By Admin | Updated: April 27, 2016 02:39 IST2016-04-27T02:39:43+5:302016-04-27T02:39:43+5:30

धारावी परिसरात घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीला मारहाण करत, तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी आठ दिवसांनी अटक केली.

Detained after eight days of molestation | विनयभंग करणारा आठ दिवसांनंतर अटकेत

विनयभंग करणारा आठ दिवसांनंतर अटकेत

मुंबई : धारावी परिसरात घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीला मारहाण करत, तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी आठ दिवसांनी अटक केली. आईसोबत राहणारी ही १५ वर्षीय मुलगी १३ एप्रिलला घरी एकटीच असताना परिसरात राहणारा आरोपी तिच्या घरी आला. ‘तुझ्या आईचे माझ्या मेहुण्यासोबत अनैतिक संबंध आहेत,’ असे सांगत आरोपीने पीडित मुलीला शिवीगाळ व मारहाण केली.
संध्याकाळी मुलीची आई घरी परतल्यानंतर तिने ही बाब आईला सांगितली. त्यानुसार, त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही बाब आरोपीला समजताच त्याने पळ काढला. मात्र, मुलीच्या आईने न्यायासाठी पोलीस
उपायुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी या आरोपीला धारावी पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Detained after eight days of molestation