ऑनलाइन लोकमत
टिटवाळा. दि. ४ :- येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या युवराज पॅलेस हॉटेल समोरील गुलमोहर सोसायटीत राहणारे नरेंद्र शंकर टिम (50) यांनी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.निकम हे गेली दिड दोन वर्षापासून आपल्या पत्नीसह गुलमोहर सोसायटीत तीसर्या मजल्यावरील 103 या रूम मध्ये भाड्याने वास्तव करत होते. मुलबाळ कुणीच नसल्याने ते सतत नैराश्याने राहत असत. बुधवारी त्यांची पत्नी काही कामासाठी बाहेर गेली असता त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपली जिवन यात्रा संपवली. या प्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टिटवाळा पोलीसांनी संबधीत घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली दाखल आहे. या बाबत अधिक तपास टिटवाळा पोलीस करीत आहेत.