पोलीस उपायुक्त तांबोळी यांची प्रकृती स्थिर

By Admin | Updated: January 17, 2017 06:39 IST2017-01-17T06:39:21+5:302017-01-17T06:39:21+5:30

औरंगाबदचे पोलीस उपआयुक्त निसार तांबोळी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Deputy Commissioner of Police, Tamboli, is stable | पोलीस उपायुक्त तांबोळी यांची प्रकृती स्थिर

पोलीस उपायुक्त तांबोळी यांची प्रकृती स्थिर


मुंबई : औरंगाबदचे पोलीस उपआयुक्त निसार तांबोळी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. तांबोळी यांची प्रकृती सुधारत असून त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.
मुंबईतील मॅरेथॉन स्पर्धेत धावताना अचानक कोसळल्याने त्यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तांबोळी यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास नाही, मात्र त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Deputy Commissioner of Police, Tamboli, is stable