“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 21:24 IST2025-12-08T21:19:45+5:302025-12-08T21:24:06+5:30
Deputy CM Eknath Shinde News: आनंद दिघे यांचे काम हे काही एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
Deputy CM Eknath Shinde News: महाराष्ट्राचा विकास हेच आमचे व्हिजन आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, कारशेड, मेट्रो ही कामे प्रत्यक्ष दिसत आहेत. सर्वसामान्य लोकांना फायदा होत आहे. मुंबई- वरळी सी लिंक आता वांद्रे ते वर्सोवा, पुढे विरार, वाढवणपर्यंत नेत आहोत. शिंदे दिल्लीत गेले किंवा दरेगावाला गेले की चर्चा होते. आम्ही एनडीएचा मोठा घटकपक्ष म्हणून दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेतो. कोणत्याही नाराजीसाठी त्यांना भेटत नाही. राज्य पातळीवरचे प्रश्न आम्ही तिघे जण सोडवतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जातो, बार्गेनिंग करण्यासाठी नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
साडे तीन वर्षाच्या सरकारला १०० टक्के मार्क देणार. आम्ही तिघे जण तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्हाला जो विजय मिळाला, ती जनतेने दिलेली पोचपावती आहे. नगरपालिका निडणूकीत विरोधक दिसले नाहीत. विरोधकांना हरण्याचा कॉन्फिडन्स आहे. फेसबुक लाइव्हवरून तरी सभा करायच्या होत्या, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच काही ठिकाणी आम्ही युती केली, मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवर समीकरणांमुळे वेगळे लढलो. पंतप्रधान मोदी एनडीच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल
धर्मवीर ३ चित्रपट येणार का आणि आला तर त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे यांचे काम काही एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही. पण धर्मवीर ३ चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यानंतर पुढे काय झाले हे मलाच माहिती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर आतापर्यंत धर्मवीर आणि धर्मवीर २ असे चित्रपट आले आहेत. यात धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे दाखवण्यात आले. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. आनंद दिघे यांच्या मृत्यूवर शंकाही उपस्थित केली जाऊ लागली.