एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:02 IST2025-10-15T11:02:03+5:302025-10-15T11:02:39+5:30

Deputy CM Eknath Shinde News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटासह, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

deputy cm eknath shinde big blow to ncp sharad pawar group and congress many leaders join shiv sena | एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

Deputy CM Eknath Shinde News: मुंबईसह आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाचा ओघ वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. केवळ ठाकरे गट नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसलाही एका मागून एक धक्के बसत आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत शिवसेनेत झालेल्या सर्व प्रवेशांविषयी माहिती दिली. जळगाव, अमळनेर, पालघर यांसह अनेक ठिकाणच्या नेत्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरीभाऊ पाटील गोरेगावकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह हिंगोली आणि अमळनेरमधील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. 

शिरीष चौधरी यांच्यासह उबाठा गटाचे अमळनेरचे माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी, माजी सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संघनाशिव, साखरलाल महाजन आणि इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

हिंगोलीमधील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कांतराव हराळ, माजी शिक्षण सभापती भय्या देशमुख, माजी सभापती बाजीराव जुमडे, माजी उपसभापती मदन इंगोले, डॉ. आर. जी. कावरजे, द्वारकादास सारडा, न्यानोबा कवडे आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने स्थानिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र लखू माच्छी तसेच उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख हसमुख धोडी आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष मिलिंद मावळे, माजी नगरसेवक सईद शेख, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खुताडे, दिनेश माच्छी, मिलन माच्छी, योगेश मेहेर, दीप धोडी, वैभव मर्दे, महिला संघटिका अस्मिता धोडी, माजी नगरसेविका माधुरी धोडी आणि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

 

Web Title : एकनाथ शिंदे को मिली मजबूती, कई नेता शिवसेना में शामिल

Web Summary : एकनाथ शिंदे की शिवसेना को कांग्रेस, एनसीपी के नेताओं के शामिल होने से मजबूती मिली। जलगाँव, हिंगोली, पालघर के प्रमुख नेता स्थानीय चुनावों से पहले शिवसेना में शामिल हुए।

Web Title : Eknath Shinde Gains Strength as Leaders Join Shiv Sena

Web Summary : Eknath Shinde's Shiv Sena gains momentum as leaders from Congress, NCP join. Key figures from Jalgaon, Hingoli, Palghar switch allegiance, boosting party strength before local elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.