शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:16 IST

Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद

Deputy CM Eknath Shinde News: बिहारमध्ये एकेकाळी असलेले जंगलराज संपुष्टात आणून तेथे एनडीएचे सरकार आले. त्यामुळे तेथील जनतेला पुन्हा जंगलराज नको असून, विकासाच्या मुद्द्यावर मतदार मतदान करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईच्या कांदिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी मदत केली. त्यामुळे राज्यात दुहेरी इंजिन सरकार आले आहे. देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे शिंदे म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ११ तारखेला होणार आहे. जनता पुन्हा एनडीएसोबत उभी राहील. गुंडागर्दी आणि जंगलराज नको म्हणून जनता विकासाची निवड करीत आहे, असे एकनाथ शिंदेंनी नमूद केले.

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राहुल गांधींचे बेछूट आरोप

राहुल गांधी यांच्यावर घणाघात करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत. मोदी सरकारवर मतचोरीचा आरोप करणाऱ्यांनी आधी नोटचोरी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी नेशन फर्स्ट, तर विरोधकांसाठी करप्शन फर्स्ट आहे. बिहारची जनता विरोधकांना धडा शिकवून एनडीएला पुन्हा सत्ता देईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. लवकरच बिहार निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी स्वतः बिहारला जाणार असून, संजय निरुपम यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. 

दरम्यान, पोईसर येथे गेली ५० वर्षे लोकं झोपडपट्टीत राहत असून क्लस्टर पुनर्विकास योजना राबवून सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन नक्की प्रयत्न करेल. तसेच पोईसर नदी शुद्धिकरणासाठी इथे एसटीपी कार्यान्वित करण्यात येईल. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत डीप क्लीन ड्राइव्ह मोहीम राबवून रस्ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न मी केला होता, पावसाने उघडीप दिल्यानंतर पोईसर परिसरातून या मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात करू असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि शिवसेनेचे उत्तर भारतीय आघाडीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde: No 'Jungle Raj' Again in Bihar, Support NDA

Web Summary : DCM Eknath Shinde urged Bihar voters to support NDA for development, not 'jungle raj'. He criticized Rahul Gandhi's accusations and pledged to campaign with Sanjay Nirupam. Shinde also promised slum redevelopment and river cleanup in Mumbai, restarting a deep clean drive.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSanjay Nirupamसंजय निरुपमNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी