Ladki Bahin Yojana September 2025 Installment Date: लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये नेमके कधी मिळणार, याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. यातच लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
केवायसी ही करावीच लागणार आहे
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अडचणी येत आहेत. ऑगस्टमध्ये आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये शिथिलता ठेवली होती. परंतु, आता लाडकी बहीण योजनेचा हा निधी त्याच लाडक्या बहिणींकडे जावा, जी या योजनेत पात्र लाभार्थी असेल. त्यासाठी आपण केवायसी करत आहोत. आपण मुदत वाढवायची असेल तर करू. पण केवायसी ही करावीच लागणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस १० ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
Web Summary : ₹1500 Ladki Bahin Yojana installment for eligible beneficiaries will be credited soon. E-KYC is mandatory for the scheme, says Ajit Pawar. The process starts October 10.
Web Summary : पात्र लाभार्थियों को लाड़की बहिन योजना की ₹1500 की किस्त जल्द ही मिलेगी। अजित पवार का कहना है कि योजना के लिए ई-केवाईसी अनिवार्य है। प्रक्रिया 10 अक्टूबर से शुरू होगी।