'संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड', ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:59 IST2026-04-12T14:59:22+5:302026-04-12T14:59:38+5:30

Asha Bhosle News: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar pays tribute to veteran singer Asha Bhosle, the 'Empress of melodies' in the music world, who has passed away. | 'संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड', ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

'संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड', ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.

आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतिक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले आहे.

आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Web Title : आशा भोसले, संगीत की कोकिला, का निधन; श्रद्धांजलि अर्पित

Web Summary : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ने आशा भोसले के निधन पर शोक व्यक्त किया, इसे एक स्वर्णिम युग का अंत बताया। भोसले की मधुर आवाज और विविध प्रदर्शनों की सूची ने दशकों तक दर्शकों को मोहित किया। भारतीय संगीत में उनके योगदान ने उन्हें वैश्विक पहचान दिलाई, जिससे उद्योग में एक शून्य पैदा हो गया। परिवार और प्रशंसकों के प्रति संवेदना।

Web Title : Asha Bhosle, Nightingale of Music, Passes Away; Tributes Pour In

Web Summary : Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar mourns Asha Bhosle's demise, calling it the end of a golden era. Bhosle's melodious voice and diverse repertoire captivated audiences for decades. Her contributions to Indian music earned her global recognition, leaving a void in the industry. Condolences to the family and fans.