शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी शांत रहायच आणि इतरांना...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:43 IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. काल मुंबईत शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत केले.

मुंबई-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. काल मुंबईत शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत केले. आज संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले, त्यांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. लवकरच मी त्यांची भेट घेणार आहे, असं राऊत म्हणाले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

"संजय राऊत काय बोलले हे मी काही ऐकले नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. पण, मी सगळ्यांना भेटत असतो. राजकारणातील कटुता दूर करायची असेलतर सगळ्यांना धरुन ठेवायचे असते. नेत्यांनी शांत रहायच आणि इतरांना बोलायला लावायच ही पद्धत बंद करायला पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता ईडी हायकोर्टात गेले आहे. आता हायकोर्ट काय निर्णय घेते ते पाहू मी यावर आता काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.          

फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले, त्यांची भेट घेणार; संजय राऊत यांचं महत्वाचं विधान!

 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी संजय राऊत यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हा मी तुरुंगात होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...

"राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे