शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जबाबदारी आली अन् "सारथी" ला पुन्हा स्वायत्तता मिळाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 20:49 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जबाबदारी देताच सारथी संस्थेत सकारात्मक बदल सुरू

ठळक मुद्देआवश्यक उपक्रम, कल्याणकारी योजना यांची निवड व अंमलबजावणी करता येणार

पुणे : राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर  मराठा समाजातील तरुण-तरुणीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्वायत्ता काढून घेतली होती. याबाबत गेले वर्षभर शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होते. अखेर आंदोलनाला यश आले असून, शासनाने गुरूवार (दि.१५ ) रोजी स्वतंत्र अद्यादेश काढून सारथी संस्थेला पुन्हा एकदा "स्वायत्ता" देण्यात आली आहे. 

मराठी समाजातील तरुण मुला-मुलींच्या हितासाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने ‘सारथी’ या स्वयत्त संस्थेची स्थापन केली होती. परंतु राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सारथी’ संस्थेची स्वयत्तता काढून घेण्यात आली. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच गाजत आहे. सारथी संस्थेच्या मुद्यावरुन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले.

 खासदार संभाजीराजे यांनी देखील पुण्यात येऊन सारथी संस्थेच्या बाहेर आंदोलन केले. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी सारथी संस्थेची सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली. सारथीची जबाबदारी पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी देखील तातडीने संस्थेला निधी उपलब्ध करून दिला. स्वत: भेट देऊन अडचणी समजून घेतल्या, संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. अजित पवार यांच्यामुळे अखेर सारथी संस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. 

शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सारथी संस्थेला आवश्यक ते उपक्रमे , कल्याणकारी योजना याची निवड करुन अंमलबजावणी करता येईल.  संबंधित प्रशासकीय विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येणारे तत्सम उपक्रम व कल्याणकारी योजनाबाबत निश्चित करण्यात आलेले आर्थिक निकष व प्रशासकीय पध्दत इत्यादी विचारात घेऊन "संचालक मंडळ" स्तरावर उचित निर्णय घेता येईल. या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक यांना पूरक,उद्दिष्टे साध्य करण्यासाठी "संचालक मंडळ संबधित प्रशासकीय विभागाकडून पूर्व सहमती घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारmarathaमराठाState Governmentराज्य सरकार