‘मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, जरा दमाने घ्या !’ कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:05 AM2024-02-12T09:05:05+5:302024-02-12T09:05:38+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा मिशन या मेळाव्याचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. 

Deputy Chief Minister Ajit Pawar gave valuable advice to the Party workers | ‘मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, जरा दमाने घ्या !’ कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका

‘मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, जरा दमाने घ्या !’ कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका

पुणे - जरा दमाने घ्या. थोडी कळ सोसा, नुसतं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करण्याकडे आधी लक्ष द्या, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री करायचे आहे’, असे म्हणणाऱ्या पक्षातील नेते अन् कार्यकर्त्यांना दिला.

कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका. त्यातून तुमच्या मनामध्ये चलबिचल आणू नका. नव्या विचाराने आपण पुढे जात आहोत, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा मिशन या मेळाव्याचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. 

सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर शाईफेक 
सुपे : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावी खासदार म्हणून लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शाई फेकण्याचा प्रकार काऱ्हाटीपाटी नजीक रविवारी घडला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी फ्लेक्स उतरवला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar gave valuable advice to the Party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.