शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरण काळातही उपमुख्यमंत्री 'अ‍ॅक्टिव्ह' ; 'हा' फॉर्म्युला वापरून कामाचा धडाका सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 12:06 IST

अजित पवार हे ग्राऊंड वर काम करणारे मंत्री म्हणून प्रचलित आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्राऊंड लेव्हलला काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अगदी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून ते अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा पाहणी करण्यापर्यंत त्यांनी ग्राऊंड लेव्हलला काम करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक सुरक्षिततेच्या कारणामुळे गृह विलगीकरणात असताना देखील पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आपल्या कामकाजाचा धडाका सुरूच ठेवला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याहून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थोडी कणकण, थंडी, ताप जाणवू लागल्यामुळे आणि सध्या कोरोनाची साथ असल्यामुळे काळजी घेत होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तसेच तातडीने त्यांनी आपली कोरोना टेस्ट सुद्धा करून घेतली. ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांनी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.परंतू , या काळात देखील उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच आहे. 

अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून तब्येत अस्वस्थतेमुळे मुंबई येथील आपल्या देवगिरी या निवासस्थानी गृह विलगीकरणात आहे. या काळात सुद्धा त्यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. आणि विशेष म्हणजे स्वत: अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यालयीन कामकाजात सहभागी होत असल्याची माहिती आहे. महत्वाच्या विविध बैठकांना त्यांनी याप्रकारे हजेरी लावली आहे. 

 उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी  कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार