उपमुख्य कार्यकारी अधिकारी लाच घेताना जाळ्यात

By Admin | Updated: January 25, 2017 03:15 IST2017-01-25T03:15:44+5:302017-01-25T03:15:44+5:30

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना शिपाई संजय बोरसे याच्यासह मंगळवारी दुपारी नंदुरबारच्या

Deputy Chief Executive Officer gets caught in the bribe | उपमुख्य कार्यकारी अधिकारी लाच घेताना जाळ्यात

उपमुख्य कार्यकारी अधिकारी लाच घेताना जाळ्यात

धुळे : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना शिपाई संजय बोरसे याच्यासह मंगळवारी दुपारी नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले़ त्यांना अटक करण्यात आली आहे.
रौंदळ यांनी पदोन्नतीसाठी स्वत:च्याच कार्यालयातील कारकुनाकडे बोरसेमार्फत ५० हजार रुपयांची लाच मागतिली होती. त्याबाबत कारकुनाने नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली होती़ मंगळवारी त्यांच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर शिपायामार्फत लाच घेताना रौंदळ व बोरसे यांना पकडले. सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रौंदळ तीन वर्षांपासून कार्यरत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Deputy Chief Executive Officer gets caught in the bribe