२४ उमेदवारांची अनामत जप्त

By Admin | Updated: May 17, 2014 23:12 IST2014-05-17T22:23:09+5:302014-05-17T23:12:05+5:30

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

The deposit of 24 candidates was seized | २४ उमेदवारांची अनामत जप्त

२४ उमेदवारांची अनामत जप्त

वाशिम : मोदी लाटेने भल्या भल्यांना पराभवाची चव चाखावी लागली असुन यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या भावना गवळी व कॉग्रेसचे शिवाजीराव मोघे हे दोन उमेदवार वगळता अन्य सर्व २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेना, भाजप युतीच्या गवळी, काँग्रेसचे मोघे यांच्यासह एकूण २६ उमेदवारांनी यावेळी निवडणूक लढविली त्यात भावना गवळींना चार लाख ७७ हजार ९0५ मते मिळून त्या विजयी झाल्या. शिवाजीराव मोघे तीन लाख ८४ हजार ८९ मते मिळवून दुसर्‍या क्रमांकावर राहिले. बहुजन समाज पार्टीचे उमेवार बळीराम राठोड ४८ हजार ९८१ मते मिळवून तिसर्‍या स्थानी, मनसेचे राजु पाटील राजे २६ हजार मते प्राप्त करुन चवथ्या स्थानावर, भारिप बमसंचे उमेदवार मोहन राठोड पाचव्या स्थानी राहिले. आम २२आदमी पार्टीचे उमेदवार नरेश राठोड यांना ६,४,२३, फॉररवर्ड ब्लॉकचे उमेदवार भाई जांबुवंतराव धोटे यांना ४७0८ समाजवादी पार्टीचे उमेदवार अहेमद वरवेज इकबाल यांना ३,२६२ काही अपक्ष उमेदवारांपेक्षाही कमी मते पडले. उर्वरीत काही पक्षांचे उमेदवार व अन्य अपक्ष उमेदवारांना किमान ८९५ ते ७४८२ दरम्यान मते मिळाली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील एकूण १७ लाख ५४ हजार २३८ मतदारांपैकी १0 लाख ३३ हजार ४0२ मतदारांनी मतदान केले होते. त्या मतदानापैकी नकाराधिकाराची ५ हजार ५८३ मते व ४५३ अवैध मते अशी एकूण ६ हजार ३६ मते वगळता उरलेल्या १0 लाख २७ हजार ३६६ मतांच्या एकषष्टामांश मते अर्थात एक लाख ६९ हजार ५६१ पेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. यवतमाळ वाशिम मतदार संघात विजयी ठरलेल्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी व त्यांचे निकटम प्रतिस्पर्धी ठररलेले काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे हे दोन प्रमुख उमेदवार वगळता मतदार संघातील अन्य एकाही उमेदवाराला अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक असलेली एक लाख ६९ हजार ५६१ या संख्ये एवढी मते मिळविता आली नाहीत. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकावर राहिलेले बसपाचे बळीराम राठोड, त्यानंतरच्या क्रमांकावरील मनसेचे राजु पाटील राजे, भारिप बमसंचे मोहन राठोड, आम आदमी पार्टीचे नरेश राठोड, फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार व विदर्भवीर भाई जांबुवंतराव धोटे, समाजवादी पार्टीचे उमेदवार अहेमद परवेज इकबाल, यांच्यासह काही विविध पक्षांच्या व अन्य सर्व अपक्ष उमेदवार अशा एकूण २४ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत.

Web Title: The deposit of 24 candidates was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.