शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आषाढीवारीचे प्रस्थान : लेकरांविना 'माऊली' आजोळघरी मुक्कामी; दरवर्षीपेक्षा आगळावेगळा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 20:27 IST

ना फेर-फुगड्या, ना देहभान विसरून नाचणारे वारकरी..

ठळक मुद्देशासकीय नियमांचे पालन; माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान

भानुदास पऱ्हाड -आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८९ व्या आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटा नादाने सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोटेखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला, ना पखवादाची थाप घुमघुमली. ना फेर-फुगड्या, ना देहभान विसरून नाचणारे वारकरी. दरवर्षी लाखो लेकरांसह निघणाऱ्या पालखी सोहळ्याने यंदा शासनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी ४.३०च्या सुमारास माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले. 

प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाल्यानंतर, प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती आणि महापूजा करण्यात आली. वीणामंडपात सकाळी दहानंतर वैष्णवमहाराज चोपदार यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.

ब्रह्मवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना पानदरवाज्यातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मालकांनी शितोळे सरकारांना सन्मानपूर्वक मंदिरात आणले. माऊलींची आणि गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून, चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले. वीणामंडपातून चलपादुका बाहेर आणल्यानंतर, मंदिर आवारात मोजक्याच वारकऱ्यांच्या 'ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या' जयघोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला. ..............          माऊलींच्या १८९ व्या आषाढीवारी प्रस्थानाप्रसंगी पवमान अभिषेक, ब्रह्मवृंदाचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने 'श्रीं'ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे साजिरे रूप आकर्षक दिसून येत होते.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी