दिवसभरात डेंग्यूचे 24 नवे रुग्ण
By Admin | Updated: August 22, 2014 23:49 IST2014-08-22T23:49:05+5:302014-08-22T23:49:05+5:30
शहराला डेंग्यूचा विळखा दिवसें दिवस वाढतच चालला असून, आज दिवसभरात डेंग्यूची लागण झालेले 24 नवीन रुग्ण शहरात आढळून आले आहेत.

दिवसभरात डेंग्यूचे 24 नवे रुग्ण
पुणो : शहराला डेंग्यूचा विळखा दिवसें दिवस वाढतच चालला असून, आज दिवसभरात डेंग्यूची लागण झालेले 24 नवीन रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 113 वर पोहोचली आहे. तर गेल्या आठ महिन्यांतील रुग्णांची संख्या 1428 वर पोहोचली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शहरात जून महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. या संख्येवर नियंत्रण आणण्यात महापालिकेस अपयश येत असून, दर महिन्यास या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. शहरात जून महिन्यात 249, जुलै महिन्यात 66क्, तर 22 ऑगस्टअखेर 113 डेंग्यूचे लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.(प्रतिनिधी)