शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या भिंती तोडून घडले माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती : कुरूंदवाड येथील बागवान कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात

गणपती कोळी -कुरुंदवाड --‘जिसका कोई नहीं होता, उसका खुदा होता हैं’ याचा प्रत्यय कुरुंदवाडवासीयांनी दाखवून दिला. येथील ढेपणपूर वसाहतीत पती-पत्नीवर खुनीहल्ला झाला. यामध्ये दस्तगीर अल्लाबक्ष बागवान मृत झाले, तर पत्नी परवीन बागवान रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. बागवान दाम्पत्याला चार लहान मुले असून, मुलांना आई मिळवून देण्यासाठी शहरवासीयांनी जातिभेदाच्या भिंती तोडून हजारो रुपयांचा मदतीचा हात दिला आहे. या मदतीतून माणुसकीचे दर्शन तर घडले आहेच, शिवाय हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेल्या या शहराने ऐक्याची मूठ आणखी घट्ट केली आहे. चार दिवसांपूर्वी येथील ढेपणपूर वसाहतीमध्ये दिलीप माळी या तरुणाने किरकोळ कारणावरून दस्तगीर बागवान (वय ३५) व परवीन बागवान (३०) या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना दस्तगीर यांचा मृत्यू झाला, तर परवीन अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, या हल्ल्यातून हिंदू-मुस्लिम ऐक्याला तडा जाऊन वाद पेटण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणा सतर्क झाली. जलद कृती दलासह मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला. मात्र, वाद तर नाहीच, या दाम्पत्याला आकसा (१४), अंजलना (९), अलसिबा (७) या तीन मुली व महंमदअतीफ (३) हा मुलगा, अशी चार मुले आहेत. खुनी हल्ल्यातून मुले बापाला मुकली, किमान आईतरी मिळू दे, म्हणून सर्वच समाजातील लोक एकत्रित येऊन मदतीचा हात देत आहेत. त्यामुळे पोलीसही अवाक् झाले असून, या हिंदू-मुस्लिम ऐक्यालाच सलाम करीत आहेत.मदतीचा हातपरवीन बागवान अद्यापही गंभीर अवस्थेत असून, त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असल्याने उपचारासाठी व मुलांच्या खर्चासाठी पालिका सभागृहात सर्व जातीधर्माची बैठक बोलाविण्यात आली होती. प्रत्येक समाजातील व्यक्तीने घटना दुर्दैवी म्हणून उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात दिला, तर अनेकांनी लहान मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली. पोलिसांची बांधीलकी हिंदू-मुस्लिम वाद होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र, शहरवासीयांनी पोलिसांची शक्यता पिटाळत ऐक्याचे दर्शन घडवून दिल्याने पोलीस अधिकारीही थक्क झाले. त्यामुळे बागवान यांच्या उपचारासाठी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनीही दहा हजारांची आर्थिक मदत देऊन ऐक्यात सहभाग घेतला.शहर एकवटलेदस्तगीर बागवान यांना शेतीवाडी नसून राहावयास घरही नाही. भाड्याच्या लहानशा खोलीत राहून ते येथील मार्केटमध्ये हमाली करून संसाराचा उदरनिर्वाह करीत होते. प्रत्येकाशी आदराने वागणाऱ्या या तरुणावर काळाने घाला घातल्याने त्यांच्यासाठी शहरच एकवटले आहे.