शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

देशात लोकशाही जगली पाहिजे, लोकांची डोकी काय फोडताय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:12 IST

लोकांवर जोरजबरदस्ती करण्याची गरज काय? चांगले प्रकल्प आणा, आम्ही विकासाच्या आड येत नाही असंही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले. 

मुंबई - न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या अंमलाखाली घेण्याची तयारी झालीय. न्यायमूर्ती कोण हेच ठरवणार. इस्त्राईलमध्येही तेच झाले. लाखो लोक रस्त्यावर उतरले. पंतप्रधान बाहेर पडू शकत नव्हते इतका जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. भारत देशात लोकशाही जगली पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे त्यासाठी रस्त्यावर उतरायलं हवं. लोकांच्या हिताची गोष्ट असेल तर ती डोकी फोडून का सांगताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला विचारला आहे.  

...मग डोकी काय फोडताय? रिफायनरीसाठी बारसूतील जागा होय मी सुचवली पण अडीच वर्ष पोलीस यंत्रणेचा वापर करून तिथल्या लोकांवर अन्याय केला नाही. माझ्या निर्णयावर इतके प्रेम होते मग आरेच्या जागेचा निर्णय का बदलला? बुलेट ट्रेन कोणासाठी करताय? राज्याच्या मूळावर येणारे विषय मी अडवले होते आणि यापुढेही अडवेन. बारसू, नाणारबद्दल मी भूमिका मांडली ती तिथल्या स्थानिक लोकांची होती. पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प नको. रिफायनरी प्रकल्पाचं राज्यात कुठे स्वागत होत असेल तर तिथे जरूर लावा. बारसूची जागेचा प्राथमिक अहवाल आला. ती जागा मोकळी आहे. तेव्हा मी ती जागा सुचवली. लोकांच्या हिताची गोष्ट आहे मग ती डोकी फोडून का सांगताय? लोकांवर जोरजबरदस्ती करण्याची गरज काय? चांगले प्रकल्प आणा, आम्ही विकासाच्या आड येत नाही असंही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले. 

लोकांच्या मनातील संशय दूर करा एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? चांगले प्रकल्प असतील ते इतर राज्यात पाठवले. रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत. कोकणात आम्ही पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला मग त्यात पुढे का काही करत नाही? राज्यात उद्योगधंदे आहेत म्हणून राज्य वर आलंय. कष्टकरी, कामगार राज्यात आहेत. प्रकल्प लोकांना दाखवा, लोकांच्या मनातील संशय दूर करा. रोजगार उपलब्ध होणार असेल तर तो कायमस्वरुपी मिळणार आहे की नाही ते सांगा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दलालांना पैसे मिळणार, सरकार दडपशाही करणारएखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जमीन भूसंपादित करायची असते. तेव्हा मूळ मालक असतो त्याला किंमत द्यावी लागते. रिफायनरी आणखी कुठे लागलीय तिथे लोकांना न्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं असेल तर ते दाखवा. लोकांना चिरडून, कुणाच्यातरी सुपारी घेऊन प्रकल्प लादतायेत. मूळ मालक वेगळेच झालेत. दलालांनी जागा विकत घेतल्या. त्या लोकांना नुकसान भरपाई मिळणार. सरकार दडपशाही करणार असा आरोप ठाकरेंनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा