शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारणासाठी पैशांची मागणी

By admin | Updated: March 13, 2015 06:00 IST

घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून मोफत व्हावे याकरिता संमेलनाचे स्वागताध्यक्ष

मुंबई : घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून मोफत व्हावे याकरिता संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी प्रस्ताव पाठवला होता. परंतु या प्रसारणासाठी दूरदर्शनने ५ लाख रुपये तर आकाशवाणीनेही पैशाची मागणी केल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी दिली. ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पंजाब सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. संमेलनासाठी येणाऱ्या सर्व साहित्यप्रेमींच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च पंजाब सरकारतर्फे करण्यात येणार आहे. घुमान येथील साहित्य संमेलन देशातील सर्व खेड्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आम्ही आकाशवाणी आणि दूरदर्शनकडे ही मागणी केल्याचे वैद्य यांनी सांगितले. साहित्य नगरीस संत श्रेष्ठ नामदेव नगरी, व्यासपीठास लाल-बाल-पाल व्यासपीठ नाव देण्यात आले आहे. दोन्ही व्यासपीठांस श्री गोविंद सिंह आणि काकासाहेब गाडगीळ आदींची नावे दिली आहेत. भव्य सभामंडपाचे नाव श्री गुरूनानक देवजी असे ठेवले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांना संमेलनास उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे; परंतु अद्यापही त्यांचे उत्तर आले नसल्याचे वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)