शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

नाशिकच्या लाचखोर अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’, धनंजय मुंडेंकडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 4:13 AM

सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनपैकी एका अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’ उघड झाले असून तक्रार मागे घेण्यासाठी संबधितांच्या निकटवर्तीयांकडून धमकी देण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले.

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनपैकी एका अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’ उघड झाले असून तक्रार मागे घेण्यासाठी संबधितांच्या निकटवर्तीयांकडून धमकी देण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. तर चौकशीत राजकीय राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे सांगत सखोल तपासाची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात केली आहे.शासकीय ठेकेदार युवराज पुंडलिक मोहिते यांच्या घरी जाऊन संबंधित अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंडप्रवृत्तीचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत़ माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून, पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी तक्रारदाराने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याकडे केली आहे़ दोन वर्षांपासून केलेल्या वेगवेगळ््या कामांची त्यांची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत.धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून माझ्याकडेही अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार हे सत्ताधारी पक्षातील उच्च पदस्थांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या लोकप्रतिनिधी, अधिकाºयांकडून तपासात अडथळा, दबाव आणला जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. ''स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चांअटक केलेले कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार हे महापौर रंजना भानसी यांचे बंधू दिलीप राऊत यांचे जावई आहेत. त्यातच एका भाजपा आमदारानेच त्यांची नाशिकमध्ये बदली केली होती, अशीदेखील चर्चा आहे. सत्तारूढ भाजपाशी संबंध बघता सदरचे प्रकरण दडपण्याचा प्र्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असून, सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुख्य अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलनही केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेGovernmentसरकार