रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात महिलेची प्रसूती
By Admin | Updated: April 29, 2017 02:44 IST2017-04-29T02:44:08+5:302017-04-29T02:44:08+5:30
येथील स्त्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच गुरुवारी दुपारी एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात महिलेची प्रसूती
उस्मानाबाद : येथील स्त्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच गुरुवारी दुपारी एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला आहे़
उस्मानाबाद तालुक्याच्या गोपाळवाडी शिवारातील एका गर्भवती महिलेला गुरुवारी दुपारी येथील स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आणण्यात आले. मात्र, तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांना बाहेर काढले़ संबंधित महिलेला होणाऱ्या वेदनांकडेदेखील त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे ती महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात बसली आणि तेथेच तिची प्रसूती झाली़ तिने मुलाला जन्म दिला. या प्रकारामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ नंतर महिला व बाळाला त्यांनी रिक्षातून खासगी रुग्णालयात नेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
(प्रतिनिधी)