शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ जन्मोत्सवासाठी अरविंद केजरीवाल आज बुलडाण्यात, सिंदखेड राजामध्ये घेणार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 11:06 IST

आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येणार आहेत

बुलडाणाआम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येणार आहेत. येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांचा बिगुल फुंकणार असल्याची माहिती आहे. देऊळगाव राजा रोडवरील भगवानबाबा महाविद्यालयाच्या मैदानावर केजरीवालांची संकल्प सभा होणार असल्याची माहिती आहे. सभेनिमित्त केजरीवाल काल रात्री औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. रात्री8.30 वाजता अरविंद केजरीवाल यांचे सुभेदारी गेस्ट हाऊसवर आगमन झाले.

महाराष्ट्र सरकारच्या राजकीय दबावामुळे, स्थानिक पोलीस यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी या सभेस परवानगी नाकारली होती. परंतु यानंतर स्थानिक कार्यकर्ते दोन दिवस पोलीस स्टेशनवर ठिय्या देऊन होते. राज्यभर याचे पडसाद माध्यमांमधून उमटल्यावर 9 जानेवारीच्या संध्याकाळी उशिरा पोलीस परवानगी देण्यात आली. 

मागील वर्षभर महाराष्ट्रात शेती, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता आहे. विकास खुंटला आहे. त्याच बरोबर विविध समाजातील असलेल्या असंतोषाला मोठ्या जनमोर्च्यांनी वाचा फोडली आहे. शेतीचे आणि शेतमालाच्या भावाचे प्रश्न पुढे आले आहेत. या सर्वच आघाड्यावर भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे निष्क्रिय कॉंग्रेस आणि तडजोडीचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांकडूनही अपेक्षाभंग झाला आहे. 'नाही रे' वर्गातील अस्वस्थता वर्षारंभी झालेल्या दंगलीतून बाहेर आली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल टाकत आहे.दिल्लीत सत्तेत येताना रिक्षा ड्रायव्हर, असंघटीत कष्टकरी, वंचित समाज, अल्पसंख्याक या सोबत सुशिक्षित आणि उच्चशिक्षित वर्गानेही आप ला पाठींबा दिला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या आप सरकारने शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य या क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांना हात घालण्याचा मार्ग महाराष्ट्रातही अवलंबला जाईल. त्यामुळेच शेतीप्रश्नाने अडचणीत आलेल्या मराठवाडा भागात या सभेची सुरवात होत असून ग्रामीण व शहरी वर्गास एकत्र घेऊन पुढे जाण्याचे आपचे धोरण आहे.

खडसे, भुजबळ आणि इतर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या आप च्या महाराष्ट्रातील प्रवेशाने राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याची सुरवात सभेला परवानगी नाकारण्याने झाली होती. आता १२ जानेवारी रोजी केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्या सभेविषयी सामान्य जनतेच्या मनात उत्सुकता असून आम आदमी पार्टी जनतेच्या मूलभूत अपेक्षा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या आकांशाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रात येत आहे. या सभेनिमित्ताने माजी खासदार ब्रिगेडिअर सावंत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर तसेच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सनदी अधिकारी आपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपbuldhanaबुलडाणा