पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक अर्धातास उशिराने

By Admin | Updated: April 11, 2016 09:58 IST2016-04-11T07:23:17+5:302016-04-11T09:58:38+5:30

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत.

Delay to traffic on the Western Railway route | पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक अर्धातास उशिराने

पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक अर्धातास उशिराने

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ११ - आठवडयाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. 
 
बोरीवली-कांदिवली स्थानका दरम्यान सकाळी खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला असला तरी, लोकल वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. पश्चिम रेल्वे मार्गावर गाडया अर्धातास उशिराने धावत आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी असून  चर्चगेटच्या दिशेने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. 
 
यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रंचड हाल होत आहेत. रेल्वे पाठोपाठ रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरीकांचा खोळंबा होत आहे. 

Web Title: Delay to traffic on the Western Railway route