शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर; बच्चू कडू यांचा सरकारलाही घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 18:27 IST

आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे. 

आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. 

सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले होते. आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आहे. याचदरम्यान आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे. 

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर झाला आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मराठा नक्षलवादी नाहीत, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. प्रमाणपत्र देण्यात अधिकाऱ्यांनी घोळ केला आहे. मराठा हा कुणबी आहे व त्याचे काम हे कुणबीचेच आहे. कुणबी म्हणून जर त्यांनी प्रमाणपत्र देत नसतील तर मराठा कोण आहे हे सरकारने  सांगावे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मंत्रालयात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत आमदारांनीही आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी मराठा समाजातील आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्रालय परिसरात आमदारांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेतले. याठिकाणी आमदार रोहित पवार म्हणाले की, सत्ताधारी-विरोधी आमदार मराठा समाजाला न्याय मिळावा, जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी सर्वच आंदोलन करतायेत. प्रत्येकजण आपापल्या परीने आंदोलन करत आहेत. सत्ताधारी आमदार आंदोलन करत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु ते प्रयत्न करत आहेत. सरकारने लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगेंशी चर्चा करावी. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे ते उपोषण मागे घेतील यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBacchu Kaduबच्चू कडूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार