मोदी लाटेमुळे भोरमध्ये सुळेंच्या मताधिक्यात घट

By Admin | Updated: May 17, 2014 21:45 IST2014-05-17T19:52:15+5:302014-05-17T21:45:04+5:30

सुप्रिया सुळे यांना गतवेळी ७१,३८१ मतांची आघाडी मिळाली होती. या वेळी मात्र भोरमधून १३,७४२ व वेल्हेतून ३,४५१ अशी १७,१९३चीच आघाडी मिळाली.

Deficit due to Modi wave due to drought | मोदी लाटेमुळे भोरमध्ये सुळेंच्या मताधिक्यात घट

मोदी लाटेमुळे भोरमध्ये सुळेंच्या मताधिक्यात घट

सूर्यकांत किंद्रे भोर : भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना गतवेळी ७१,३८१ मतांची आघाडी मिळाली होती. या वेळी मात्र भोरमधून १३,७४२ व वेल्हेतून ३,४५१ अशी १७,१९३चीच आघाडी मिळाली. मुळशीत जानकरांनी ३०८ मतांची आघाडी घेतली आहे. भोर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान ३,०५,११८ होते. पैकी १,७९,९५२ (५८ टक्के) मतदान झाले. २००९मध्ये २,७९,५०३ पैकी १,३७,८६२ (४९.३२ टक्के)च मतदान झाले होते. नव्याने ४२,०९० मतदार वाढले. हे मतदार, मोदी फॅक्टर व प्रस्थापितांच्या विरोधात लाट यांमुळे सुळेंना गतवेळीपेक्षा ५४,१८८ मतदान कमी झाले.
भोर तालुक्यातील वीसगाव, आंबवडे, हिडार्ेशी वेळवंड, भुतोंडे व महुडे खोर्‍यात, गुंजवणी भागात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली; तर महामार्गावरील व आसपासचा काही गावांमध्ये महादेव जानकरांनी भोर शहरात ६०४ मतांची आघाडी घेतली. कारी खानापूर व उत्रौली-रायरी गटात सुळेंना १० ते १२ हजारांची आघाडी आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह जाणवत नाही. पाच ते नवव्या फेरीपर्यंत जानकरांना अधिक मताधिक्य मिळाले.
भोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील धनगर समाजाचे एकगठ्ठा मतदान जानकरांना मिळाल्याचे चित्र त्या गावांमध्ये आहे. कारण, इतर उमेदवारांना मतदान झाले नाही. देशभर असणारी मोदी लाट, नव्याने वाढलेले ४२,०९० मतदान हे तरुणांचा कल विरोधात आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध नागरिकांचा भावना यांमुळे मतदारसंघात नवखे असणारे जानकर यांनी राष्ट्रवादीला पळता भुई थोडी केली.
मागील २००९च्या निवडणुकीत २,७९,५०३ पैकी १,३७,८६२ (४९.३२ टक्के) मतदान झाले होते. सुळेंना ९६,७३७ तर नलावडेंना २५,३५६ मते मिळाली. सुळेंनी ७१,३८१ मतांची आघाडी घेतली होती. या वेळी ३,०५,११८ पैकी १,७९,९५२ (५८ टक्के) मतदान झाले. ४२ हजार (१० टक्के) मतदान वाढले. भोर विधानसभेत सुप्रिया सुळंेना ९०,९१५ तर महादेव जानकरांना ७४,०३० मते मिळाली. सुळेंना १७,१९३ मतांची आघाडी मिळाली.
तालुक्यांनुसार मतदान- भोर एकूण मतदान १,४०,९९३, झालेले ८४,८२३ (६० टक्के) सुप्रिया सुळे ४५,८८१ मते, महादेव जानकर ३२,१३९ मते. सुळेंना १३,७४२ची आघाडी. वेल्हे- एकूण ४४,७५४, झालेले २५,६८० (५७.३८ टक्के) सुळे- १३,५३१, जानकर १०,०८०, सुळेंना ३,४५१ मतांची आघाडी. मुळशी- १,१९,३७१, झालेले ६९,४४९ (५८ टक्के). सुळे- ३१,५०३, जानकर- ३१,८११, ३०८ मतांची जानकरांना आघाडी. भोर शहर- सुळे- ३,२०१, जानकर-३,८०५, जानकरांना ६०४ मतांची आघाडी मिळाली.
मागील वेळेपेक्षा कमी झालेले मताधिक्य हे राष्ट्रवादीला विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे आत्मचिंतनाची खरी गरज आहे.

Web Title: Deficit due to Modi wave due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.