कल्याण- मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करणा-या आईला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं घराबाहेर पडलेल्या दीपाली ढोमसेचा लोकलमधून पडून अपघात झाला. इंटरव्ह्यू देऊन परतणा-या दीपालीला दिवा-कोपरदरम्यान लोकलमधून पडून झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली. रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी दिवा-कोपरदरम्यान मोटरमनला रेल्वे ट्रकलगत कुणीतरी पडल्याचे आढळल्यानंतर त्याने दीपालीला लोकलमधून डोंबिवली स्थानकात आणले. येथून तिला रुग्णालयात नेण्यात आले.बेशुद्ध असलेल्या दीपालीच्या मणक्याला फॅक्चर झाले आहे, तसेच छातीला आणि चेह-याला मार लागलाय. तिच्या डाव्या बाजूची हालचालही होत नाहीये. तिने उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. मात्र तिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यानं रुग्णालयाचं बिल भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. पैशांशिवाय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कसा मिळणार, असा प्रश्न कुटुंबीयांना पडलाय. तीन मुली झाल्यामुळे दीपालीच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे चार घरची धुणीभांडी करून तिची आई तिन्ही मुलींचं पालन-पोषण करते.
मदतीसाठी प्राजक्ता देशपांडे यांच्या खात्यावरही पैसे जमा करू शकता.Ac no. - 6546038203 Ifsc code. - IDIB000D047Indian bankPrajakta Deshpande