Deepali Chavan Suicide Case: दीपाली आत्महत्येची चौकशी सुरू, रेड्डीवर अजून गुन्हा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 04:53 IST2021-04-06T04:53:12+5:302021-04-06T04:53:35+5:30
शिवकुमार याच्या त्रासामुळे दीपालीचा गर्भपात झाल्याचे आणि तो तिला शिवीगाळ करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मात्र, लैंगिक छळाच्या अनुषंगाने तपासात काहीही आढळून आले नाही.

Deepali Chavan Suicide Case: दीपाली आत्महत्येची चौकशी सुरू, रेड्डीवर अजून गुन्हा नाहीच
अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यावर आणखी गुन्हे नोंदवले असून, तूर्त निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याच्याविरुध्द गुन्हे नोंदविलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी सोमवारी दिली.
शिवकुमार याच्या त्रासामुळे दीपालीचा गर्भपात झाल्याचे आणि तो तिला शिवीगाळ करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मात्र, लैंगिक छळाच्या अनुषंगाने तपासात काहीही आढळून आले नाही. रेड्डी याची चौकशी सुरू आहे. चौकशीत काही आढळून आल्यास गुन्हे नोंदविले जातील, असे हरी बालाजी एन. म्हणाले.
दरम्यान, बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू साळुंके यांनी दीपाली मृत्युप्रकरणी रेड्डी, शिवकुमार याच्यावर आठ दिवसांत खुनाचा गुन्हा नोंदविला नाही, तर राज्यभर आंदाेलन करू असा इशारा दिला.