दीपक केसरकर शिवसेनेत!

By Admin | Updated: August 6, 2014 03:19 IST2014-08-06T03:19:19+5:302014-08-06T03:19:19+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी आज, मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. केसरकरांमुळे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार भगवे झाले आहे.

Deepak Kesarkar Shivsenaet! | दीपक केसरकर शिवसेनेत!

दीपक केसरकर शिवसेनेत!

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी आज, मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. केसरकरांमुळे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार भगवे झाले आहे. येत्या निवडणुकीत राज्यातही भगवा फडकेल, असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.
कर्नाटक शासन मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. आम्ही लाठी उगारली, तर आमच्यावर टीका होईल; पण यापुढे आम्ही शांत बसणार नाही. कानडी लांडगे घरात घुसून अत्याचार करीत आहेत. मात्र, सर्व जण मूग गिळून गप्प बसले आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडला आहे. आपण केंद्र शासनाकडे सीमावर्ती भाग केंद्रशासित करा, अशी मागणी करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. ज्यांचे अस्तित्वच संपले, त्यांच्याबद्दल काय बोलायचे, असे सांगत त्यांनी नारायण राणो यांच्यावर भाष्य टाळले.
राक्षसी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी शिवसेनेने मला ताकद द्यावी, असे आवाहन केसरकर यांनी या वेळी केले. (प्रतिनिधी)
 
जैतापूर प्रकल्प स्थानिकांना नको असल्यास होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जाऊन वीज विकत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांनी जैतापूर घेऊन जावा. आम्ही त्यांच्याकडून वीज विकत घेऊ, असेही उद्धव यांनी जाहीर केले.

 

Web Title: Deepak Kesarkar Shivsenaet!