टक्का कमी करा; परंतु मराठा आरक्षण द्या
By Admin | Updated: August 20, 2016 01:39 IST2016-08-20T01:39:56+5:302016-08-20T01:39:56+5:30
विदर्भ-मराठवाड्यात जाती-जातींतील दरी फार भयंकर आहे. ती कमी व्हावी यासाठी सर्व संघटनांना एकत्र करून मी मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला. १९ टक्क्यांची घोषणा झाली;

टक्का कमी करा; परंतु मराठा आरक्षण द्या
कोल्हापूर : विदर्भ-मराठवाड्यात जाती-जातींतील दरी फार भयंकर आहे. ती कमी व्हावी यासाठी सर्व संघटनांना एकत्र करून मी मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला. १९ टक्क्यांची घोषणा झाली; परंतु हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यातील एक-दोन टक्का कमी करा; परंतु मराठा समाजाला आरक्षण द्या. खासदार झालो तरी या प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी येथे दिली. खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक व मी असे तिघेजण एकत्र झालो, तर कोल्हापूरचे सोने होईल व तसेच काम करून दाखवूया, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतीनियुक्त खासदार झाल्याबद्दल संभाजीराजे यांचा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ‘हा सत्कार अविस्मरणीय आहे. मला कुणाच्या मागे जाण्याची सवय नाही; परंतु हा माझ्या घराण्याचा सन्मान असल्याने तो नम्रतेने स्वीकारत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)