शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
3
धक्कादायक! SMAT स्पर्धेसाठी निवड न झाल्याच्या रागातून कोचवर जीवघेणा हल्ला; तीन क्रिकेटपटूंवर आरोप
4
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
5
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
6
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
7
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
8
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
9
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
10
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
11
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
12
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
13
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
14
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
15
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
16
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
17
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
18
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
19
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

'रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या', भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:27 IST

Bhagwat Karad News: छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा, अशी प्रभावी आणि ठोस मागणी राज्यसभेत खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज मांडली. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, नवीन मार्गांची अत्यावश्यक गरज तसेच औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा, अशी प्रभावी आणि ठोस मागणी राज्यसभेत खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज मांडली. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, नवीन मार्गांची अत्यावश्यक गरज तसेच औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. कराड म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राचे पर्यटन राजधानी मानले जाते. अजिंठा-वेरूळ लेणी, कैलास मंदिर, देवगिरी किल्ला, पानचक्की, बीबी का मकबरा या जागतिक ख्यातीच्या स्थळांमुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. तसेच दिल्ली–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन परिसरात जवळपास एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू असून, या पार्श्वभूमीवर प्रगत रेल्वे सुविधांची गरज अधिक भासते, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन वंदे भारतची मागणी सध्याची वंदे भारत एक्सप्रेस (छत्रपती संभाजीनगर–नांदेड) विस्तारून सुरू असल्याने, छत्रपती संभाजीनगर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणीही खासदार डॉ. भागवत कराड यांनी सभागृहात केली. पीट लाईन आणि सिक लाईनची कामे छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण झाल्यामुळे ही सेवा सुरू करण्यास कोणताही अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन रेल्वेमार्गांना तातडीने मान्यता द्याछत्रपती संभाजीनगरला उत्तर भारताशी जोडणाऱ्या संभाजीनगर–कन्नड–चाळीसगाव या प्रस्तावित मार्गाच्या सर्व्हेक्षणाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच संभाजीनगर–पैठण–बीड–सोलापूर या महत्त्वपूर्ण मार्गाला तातडीने मान्यता द्यावी, अशी त्यांनी मागणी केली.

याशिवाय संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे हा औद्योगिकदृष्ट्या तसेच उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण रेल्वेमार्ग असून, या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. वरील सर्व मागण्या स्वीकारून मराठवाड्यातील रेल्वे सुविधांचा विकास गतीमान करण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Declare separate railway division, give new Vande Bharat: Bhagwat Karad

Web Summary : Bhagwat Karad demanded a separate railway division for Sambhajinagar in Rajya Sabha. He also requested a new Vande Bharat train between Sambhajinagar and CSMT, emphasizing improved rail infrastructure for tourism and industrial growth in Marathwada and faster approval for new railway lines.
टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र