शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमानुसारच शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय; आयोगाच्या भूमिकेवर न्यायालयाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 10:37 IST

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरुला यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर चिन्ह वाटपांची निकड लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह व नाव गोठविण्याबाबतचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्या संघटनेचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता. त्यात नियमाचे उल्लंघन झालेले नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती.दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरुला यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर चिन्ह वाटपांची निकड लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह व नाव गोठविण्याबाबतचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाला हवी असलेली कागदपत्रे सादर करण्यास याचिकादार उद्धव ठाकरे यांनी विलंब केला. त्यामुळे ठाकरे यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप, तसेच निवडणूक आयोगावर टीका करता येणार नाही.

समता पार्टीचा दावा फेटाळला होता शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने केलेला दावा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. निवडणूक चिन्ह ही कोणा एकाची मक्तेदारी नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीला सुनावले होते व त्या पक्षाची याचिका फेटाळली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला होता.

तातडीने घेतलेला निर्णय योग्यचशिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर विधानसभा पोटनिवडणुका जाहीर झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने शिवसेनेचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याचा ८ ऑक्टोबरला निर्णय घेतला. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे कोणताही झालेला नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली शिवसेेनेचे निवडणूक चिन्ह व नाव गोठविण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या अंतरिम आदेशाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यासंदर्भातील निकालपत्रात न्यायालयाने म्हटले आहे की, शिवसेना या राजकीय पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट या पक्षात निर्माण झाले. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा व आपण त्याचे अध्यक्ष असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला होता. तसेच धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही हक्क सांगितला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCourtन्यायालय