शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अद्याप नाहीच; विद्यार्थी, शिक्षणसंस्थांना सरकारी निर्णयाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 08:11 IST

५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्या प्रतीक्षेतच आहेत.

मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेऊन ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्या प्रतीक्षेतच आहेत. महाविद्यालये कधी सुरू हाेणार, परीक्षांचे काय, याबाबत विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहेत.उदय सामंत यांनी मागील फेसबुक संवादात दिलेल्या माहितीनुसार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येणार हाेता. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठेवून त्यावर चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील कोणताही आढावा अथवा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची किंवा मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अद्याप झाली नसल्याचे समजते. याच कारणास्तव महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय बारगळल्याचे समोर आले आहे.अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच पारंपरिक महाविद्यालयांतील इतर प्रात्यक्षिकांसाठी तरी महाविद्यालये खुली करावीत, अशी निवेदने आणि पत्रे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांकडून पाठविली जात आहेत. महाविद्यालये सुरू न झाल्याने अनेक पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रखडल्या आहेत.‘ऑनलाइन शिक्षण हा केवळ पर्याय’ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग हा शिक्षणाला पर्याय असला तरी पूरक व उपयुक्त नसल्याने अनेक फार्मसी, अभियंत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चरच्या व इतर पारंपरिक शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लवकरात लवकर सरकारची मंजुरी घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.महिनाअखेरपर्यंत निर्णयउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय महिनाअखेरपर्यंत घेण्यात येईल, असे संकेते दिले आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापकEducationशिक्षण