शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 07:00 IST

सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली न करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास गुरुवारी नकार दिला.

राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करावी, तेथे सामाजिक अंतर राखण्यात येईल तसेच सर्वखबरदारीच्या उपाययोजना आखण्यात येतात की नाही, याची खात्री राज्य सरकारने करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका असोसिएशन आॅफ एडिंग जस्टिस या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

‘भाविकांना मंदिरात किंवा अन्य प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. दुर्दैवाने आपण दरदिवशी नवा उच्चांक (कोरोना रुग्णांची वाढती संख्या) गाठत आहोत. सद्य:स्थिती विचारात घेता प्रार्थनास्थळे खुली करणे अशक्य आहे,’ असे राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले. सरकारचा हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

‘त्या’ व्हिडीओची घेतली दखलआम्हाला काही दिवसांपूर्वीच एक व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ पाठविण्यात आला. हा मेसेज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय साहाय्यक कक्षाचे अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या ओमप्रकाश शेटे यांनी पाठविला होता. कोरोनाची स्थिती हाताळण्यास राज्य सरकारकडे वैद्यकीय सुविधा अपुºया असल्याने अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा दावा यात आहे. या व्हिडीओची विश्वासार्हता तपासा, असे निर्देश उच्च न्यायालयाने कुंभकोणी यांना दिले. शेटे जर सरकारचाच भाग असतील आणि व्हिडीओत तथ्य असेल तर मग तुम्हाला (राज्य सरकार) परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलावी लागतील, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHigh Courtउच्च न्यायालय