शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय स्थगित, फक्त संपकाळातील पगार कापणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 20:29 IST

ऐन दिवाळीत संपावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयाला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई -  ऐन दिवाळीत संपावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयाला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कापण्यात येणार आहे. पण 8 दिवसांची अर्जित रजा दिल्या ही वेतन कपात होणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर त्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर अखेर ही वेतनकपात मागे घेण्यात आली आहे.  एसटी महामंडळाने संपकरी कर्मचा-यांची ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला होता. ‘ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार ४ दिवसांचे वेतन कपात करा, तसेच त्या व्यतिरिक्त झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रत्येक दिवसासाठी ८ दिवस, याप्रमाणे एकूण ३६ दिवसांचे वेतन कपात करणे आवश्यक आहे. मात्र, कामगारांच्या वेतनातून करावयाच्या वैधानिक वजावटी आणि त्यांना दैनंदिन खर्चासाठी आवश्यक असणारे वेतन यांचा विचार करून, या ३६ दिवसांपैकी आॅक्टोबर महिन्यात ४ दिवसांची वेतन कपात करण्यात येणार आहे, तर उरलेल्या ३२ दिवसांची वेतन कपात पुढील ६ महिन्यांत करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व विभाग आणि अधिका-यांनी कार्यवाही करावी, असे महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीचे हे परिपत्रक राज्यातील कार्यशाळा, प्रशिक्षण संस्था आणि विभाग नियंत्रक यांना पाठविण्यात आले होते. महामंडळातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत संप पुकारण्यात आला होता. संपात सर्व पक्षीय संघटनांनी पाठिंबा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशील ठरवत, कर्मचा-यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार