शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
2
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
3
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
4
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
5
'पाकिस्तानशी युद्ध करावे लागेल...', रियासी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेचें मोठे वक्तव्य
6
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 
7
...तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणं कठीण; पराभव होताच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले...
8
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
9
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?
10
दहशतवादी तुफान गोळीबार करत असताना ड्रायव्हरनं दाखवलं प्रसंगावधान, अन्यथा आणखी प्रवाशांचे गेले असते प्राण
11
मोठ्या चढ-उतारानंतर Sensex-Nifty घसरणीसह बंद; IT शेअर्स घसरले, अल्ट्राटेकमध्ये तेजी
12
कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार
13
PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'
14
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला, दोन दिवसांपूर्वी उसळला होता हिंसाचार 
15
"मला मूल नको होतं, पण...", प्रेग्नंन्सीनंतर अदिती सारंगधरला आलं होतं डिप्रेशन; म्हणाली- "नवऱ्याबरोबर भांडण व्हायचं..."
16
भारताच्या विजयाची शक्यता होती केवळ ८%; रोहितने खेळला 'डाव' अन् पाकिस्तानची 'दांडी गुल'
17
समोसा, पिझ्झा, बर्गर खाल्लं तरी वजन वाढणार नाही; फक्त करा 'हे' काम, रिसर्चमध्ये खुलासा
18
दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम
19
एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास
20
"महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी"; विजय वडेट्टीवारांचा दावा

न्यायालयांनाही डिसेंबरची ‘डेडलाइन’; पाच ते ४० वर्षे जुन्या प्रकरणांचा निपटारा २०२४ अखेरपर्यंत करावा लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 6:45 AM

प्रलंबित प्रकरणांचे पाच वर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे. ५, १०, २०, ३० आणि ४० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित प्रकरणे.  ३० ते ४० वर्षे जुनी प्रकरणे जिल्हा न्यायालयांना जून २०२४ पर्यंत निकाली काढायची आहेत.

मुंबई : पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र, गोवा, केंद्रशासित प्रदेश दादरा, नगर आणि हवेली, दमण व दीवमधील कनिष्ठ न्यायालयांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जुनी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयांना डेडलाइन देण्यात आली आहे. त्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर नोटीस जारी करण्यात आली आहे. 

प्रलंबित प्रकरणांचे पाच वर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे. ५, १०, २०, ३० आणि ४० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित प्रकरणे.  ३० ते ४० वर्षे जुनी प्रकरणे जिल्हा न्यायालयांना जून २०२४ पर्यंत निकाली काढायची आहेत. तर १० ते २० वर्षे जुनी प्रकरणे सप्टेंबर २०२४ आणि पाच वर्षे जुनी प्रकरणे डिसेंबर २०२४ पर्यंत निकाली काढावी लागणार. उच्च न्यायालयाने काढलेल्या नोटीसमध्ये कालावधी नमूद करण्यात आला आहे.

१० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले किंवा प्रकरणे सर्व न्यायाधीशांना समान प्रमाणात वर्ग करावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना दिले आहेत. निकाल देण्यास तयार असलेल्या प्रकरणांची यादी नेतेमंडळी, सरकारी वकील आणि पोलिस ठाण्यांना पाठवावी. जेणेकरून सुनावणी सुरू करणे सोपे जाईल, असेही म्हटले आहे. ज्या प्रकरणांना जिल्हा/ सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि पूर्वी नोंदविण्यात न आलेल्या प्रकरणांना प्राधान्य द्यावे. 

उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या फेरविचार याचिका किंवा केस इन्फॉर्मेशन सिस्टीम (सीएसआय) नुसार तारखा नसलेल्या आणि सुटीच्या दिवशी सूचीबद्ध करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांना प्राधान्य देण्यात यावे. 

कुटुंब न्यायालयांसाठीही निश्चित केला आराखडा - न्यायालयाने जिल्हा प्रधान न्यायाधीश व तालुका प्रधान न्यायाधीशांना संबंधित ठिकाणच्या बार असोसिएशनच्या सदस्यांची बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन  करावे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. - कृती आराखड्यात तातडीच्या सुनावणीसाठी सीएसआयमध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. - यावर जिल्हा पातळीवरील उपसमिती देखरेख ठेवेल आणि दर महिन्याला अहवाल सादर करेल, असे नोटिशीत म्हटले आहे.  - हाच कृती आराखडा राज्यातील कुटुंब न्यायालये, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे, सहकार न्यायालये व औद्योगिक व कामगार न्यायालयांनाही  लागू करण्यात आला आहे. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टCourtन्यायालय