ऐतिहासिक नव्हे, काळीमा फासणारी कर्जमाफी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:31 IST2017-07-26T03:31:46+5:302017-07-26T03:31:50+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपूर्ण व फसवी आहे. कर्जमाफी योजनेचे सध्याचे स्वरूप शेतकºयांना न्याय आणि दिलासा देणारे नाही.

ऐतिहासिक नव्हे, काळीमा फासणारी कर्जमाफी !
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपूर्ण व फसवी आहे. कर्जमाफी योजनेचे सध्याचे स्वरूप शेतकºयांना न्याय आणि दिलासा देणारे नाही. त्यामुळे ही कर्जमाफी ऐतिहासिक नसून, राज्याला काळीमा फासणारी असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
सत्ताधारी पक्षाने कर्जमाफीच्या निर्णयावरून सरकारचे अभिनंदन करण्याकरिता मांडलेल्या प्रस्तावाला विरोध करताना ते बोलत होते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची अजून अंमलबजावणी झालेली नाही. योजनेला अंतिम रूपही मिळालेले नाही. या योजनेत उणिवा असून, त्याअनुषंगाने कर्जमाफी योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे. या परिस्थितीत कर्जमाफीसाठी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी सरकारची घाई कशाला? असा प्रश्न उपस्थित करून विखे पाटील यांनी कर्जमाफीसाठी अभिनंदनाचा हा प्रस्ताव म्हणजे वधू संशोधनाला जायचे आणि थेट पाळणा घेऊनच घरी यायचे, असा प्रकार असल्याचा चिमटा काढला.
कर्जमाफीसाठी शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज करण्याच्या सक्तीवर विरोधी विखेंनी तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा करतेवेळी लाभार्थ्यांची रक्कम, योजनेला लागणारा एकूण निधी, अशी सर्व माहिती जाहीर केली होती.